
मणगुत्ती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती, तालुका हुक्केरी येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाची चिकोडी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये पुढील विद्यार्थिनींचा सहभाग आहे. कुमारी सुषमा पाटील, दिया धनाजी, दिव्या पाटील, गौतमी पाटील तसेच बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी शिवनंदनी धनाजी हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून तसेच लालबहादूर शास्त्री शाळा सुधारणा कमिटी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन होत आहे. या विद्यार्थ्यांना
शाळेचे मुख्याध्यापक डी के स्वामी यांचे प्रोत्साहन लाभले असून क्रीडा शिक्षक एस के मेंडुले यांचे मार्गदर्शन लावले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta