Sunday , September 20 2026
Breaking News

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर।येथील प्रियदर्शिनी नवहिंद महिला मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येथे नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरपर्सन माधुरी पाटील या होत्या. व्यासपीठावर नवहिंद क्रीडा केंद्राचे उपाध्यक्ष नारायण बस्तवाडकर, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, न्यू नवहिंद सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रबोधिनी केंद्राच्या अध्यक्षा नीता जाधव, संस्थेच्या व्हा. चेअरपर्सन सुरेखा सायनेकर, संस्थेच्या सर्व संचालिका, सल्लागार शिवाजी सायनेकर, प्रमोद जाधव, सी बी पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या चेअरपर्सन माधुरी पाटील व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. त्यानंतर संस्थेच्या कर्मचारी महिलांनी स्वागत गीत गायिले.

यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा माधुरी पाटील म्हणाल्या, संस्थेला आर्थिक वर्षात 5 लाख 81 हजार इतका नफा झाला आहे, आज संस्थेकडे 74 कोटी 57 लाख इतके खेळते भांडवल आहे. संस्थेकडे 2 कोटी 82 लाखाचा निधी असून, संस्थेने 8 कोटी 64 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे, संस्थेकडे 70 कोटी 59 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे भागभांडवल 60 लाख रुपये इतके आहे. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचा वृत्तांत येळ्ळूर शाखा व्यवस्थापिका वंदना धामणेकर यांनी मांडला. नफा-तोटा पत्रकाचे वाचन येळ्ळूर शाखेच्या शाखाधिकारी श्यामल जाधव यांनी केले. ताळेबंद पत्रकाचे वाचन गोवावेस शाखेच्या शाखाधिकारी सरिता जाधव यांनी केले. नफा विभागणी पत्रकाचे वाचन वडगाव शाखेच्या शाखाधिकारी मनीषा होसुरकर यांनी केले. अंदाजपत्रकाचे वाचन पी बी रोड शाखेच्या शाखाधिकारी सीमा घाडी यांनी केले. यावेळी नवहिंदचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, व्हा. चेअरमन अनिल हुंदरे, आनंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रधान कार्यालयाचे शाखाधिकारी प्रशांत कंग्राळकर यांनी केले. शेवटी संस्थेचे सेक्रेटरी अँथोनी अल्मेडा यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *