Tuesday , March 3 2026
Breaking News

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love

 

संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सच्चिन बसप्पा द्यामण्णी (वय ३६) या कामगाराचा मृत्यू झाला. मृत सच्चिन हा हुक्केरी तालुक्यातील अम्मिनभावी गावाचा रहिवासी असून तो रोजंदारीवर काम करत होता. कारखान्यातील क्रशिंग बेल्टवर चुन्याचे काम सुरू असताना तोल जाऊन सच्चिन बेल्टमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सच्चिन हा अवघ्या १० दिवसांपूर्वीच मजुरीवर कामाला रुजू झाला होता. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

हिटनी म्हसोबा मंदिर ते हायवे रस्ता कामाचा शुभारंभ

Spread the love  संकेश्वर : हिटनी म्हसोबा मंदिर ते हायवे रस्ता कामाचा शुभारंभ आज विद्युत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *