Sunday , September 20 2026
Breaking News

दिग्गजांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाला ऊर्जा

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील; समरजितसिंह निंबाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून यरनाळ मधील समरसिंह निंबाळकर हे आमच्या संपर्कात होते. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. निंबाळकर यांना आपल्या पक्षामध्ये उत्तम प्रकारचे पद त्यांना देण्यात येईल. याशिवाय डोंगराळ भागात आत्तापर्यंत मला सर्वांनी साथ दिली आहे. यापुढे माझे सामाजिक कार्य या भागात कायमचे राहील, अशी ग्वाही सहकारत्न उत्तम पाटील यांनी दिली. यरनाळ समरसिंह दौलतराव निंबाळकर उर्फ बंटी पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक भाजप कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. त्यावेळी उत्तम पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी यरनाळ ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी कांबळे होत्या.
दौलतराव निंबाळकर यांनी, आतापर्यंत विविध पक्षात काम केले आहे. परंतु उत्तम पाटील यांच्यासारखे सामाजिक कार्य मी कुठेही पाहिले नाही. आपण आपले सामाजिककार्य पुढे चालू ठेवावे. सर्वांचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे सांगितले.
यावेळी राजू घाटगे ग्रामपंचायत सदस्या सोनल निंबाळकर, सुधीर उगळे, ऍड. संजय शिंत्रे, राजेंद्र गुरव, बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास कार्यक्रमास हालशुगर माजी उपाध्यक्ष दौलतराव निंबाळकर, सुजित जोशी, राजू पाटील, ऍड. संजय शिंत्रे, बाबासाहेब पाटील, सुरेश घाटगे, विष्णू कडाकणे, निरंजन पाटील, गुलाबराव पाटील, प्रकाश गायकवाड, इंद्रजीत सोळांकुरे, गजानन कावडकर, अभिजीत कौंदाडे, अरुण निकाडे, प्रशांत गुंडे, ऍड. दादासाहेब लंबे, संदीप संकपाळ, सचिन कौदाडे, संजय पाटील यांच्यासह यरनाळ, गव्हाण, अंमलझरी, तवंदी, शेंडूर, शिरगुप्पी येथील नागरिक उपस्थित होते. आशिष घाटगे यांनी स्वागत केले. चंद्रशेखर कलगी व स्नेहल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चंद्रकांत डावरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *