Tuesday , March 3 2026
Breaking News

कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी

Spread the love

 

बर्मिंघम : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया  याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. भारताचं स्पर्धेतील हे सहावं सुवर्णपदक असून 21 वं पदक आहे.

आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू कमाल कामगिरी करत आहेत. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात राऊंड 16 मध्ये नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्याने कॅनडाच्या मॅकनील याला 9-2 ने मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *