Wednesday , December 4 2024
Breaking News

भारताची महिला बॉक्सर नीतू घणघसने पटकाविले सुवर्णपदक

Spread the love

 

बर्मिंघम : भारताची महिला बॉक्सर नीतू घणघसनं महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव केलाय.

नीतू घणघसची दमदार कामगिरी
भारतीय महिला बॉक्सर नीतू घणघसनं कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. आजचा दिवस नीतूसाठी खास ठरलाय. आज संध्याकाळी सात वाजता आणि रात्री एक वाजता आणखी दोन भारतीय बॉक्सरचा अंतिम सामना होणार आहे. ज्यात भारताला आणखी दोन सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा आहे.

बॉक्सिंगमध्ये भारताला आणखी दोन सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
भारताची स्टार बॉक्सर निकहत झरीनं भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याच्या उद्देशानं रिंगणात उतरेल. तर, हेवीवेटच्या फायनल सामन्यात सागर अहलावत नशीब आजमवणार आहे. भारतीय वेळेनुसार, निकहतचा सामना सध्याकाळी सात वाजता सुरू होईल. तर, रात्री एक वाजता सागर अहलावतचा सामना पाहायला मिळेल.

About Belgaum Varta

Check Also

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Spread the love  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *