सिडनी : ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेला श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. यानंतर लगेचच गुणतिलकाला अटक करण्यात आली. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी रवाना झाला आहे.
डेटिंग ऍपच्या माध्यमातून भेट झालेल्या २९ वर्षीय तरुणीने गुणतिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनी येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
“सिडनीत गेल्या आठवड्यातील घटनेप्रकरणी रविवारी मध्यरात्री १ वाजता सुसेक्स स्ट्रीट हॉटेल येथून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टारला अटक करण्यात आल्याचा वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. २९ वर्षीय तरुणीने आपल्या घरात बलात्कार झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी स्टेट क्राइम कमांड आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला होता,” असं वृत्त ऑस्ट्रेलियामधील माध्यमांनी दिलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta