Friday , November 6 2026
Breaking News

श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलकाला ऑस्ट्रेलियात अटक

Spread the love

 

सिडनी : ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेला श्रीलंकेचा क्रिकेटर दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी श्रीलंकाने इंग्लंडिविरोधात आपला शेवटचा सामना खेळला होता. यानंतर लगेचच गुणतिलकाला अटक करण्यात आली. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बलात्काराच्या आरोपाखाली दनुष्का गुणतिलका याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंका संघ त्याच्याशिवाय मायदेशी रवाना झाला आहे.

डेटिंग ऍपच्या माध्यमातून भेट झालेल्या २९ वर्षीय तरुणीने गुणतिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. सिडनी येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

“सिडनीत गेल्या आठवड्यातील घटनेप्रकरणी रविवारी मध्यरात्री १ वाजता सुसेक्स स्ट्रीट हॉटेल येथून आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टारला अटक करण्यात आल्याचा वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. २९ वर्षीय तरुणीने आपल्या घरात बलात्कार झाल्याची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी स्टेट क्राइम कमांड आणि पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला होता,” असं वृत्त ऑस्ट्रेलियामधील माध्यमांनी दिलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

16 वर्षांनंतर पुन्हा विश्वविजेता स्पेन! अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनावर 1-0 अशी मात

Spread the love  फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटीनाचा 1-0 असा पराभव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *