
आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने
पुणे : सलग चार पराभवानंतर विजयपथावर परण्यासाठी उत्सुक असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघापुढे शनिवारी ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. प्लेऑफ फेरीतील स्थानांच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे.
हैदराबादच्या संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. फलंदाजीत अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडिन मार्करम आणि निकोलस पूरन यांनी कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. हैदराबादला कर्णधार केन विल्यम्सनच्या कामगिरीची चिंता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारला इतरांची साथ मिळणे गरजेचे आहे.
दुसरीकडे, कोलकाताने १२ पैकी केवळ पाच सामने जिंकले असून गुणतालिकेत ते सातव्या स्थानी आहेत. त्यांच्या फलंदाजीची कर्णधार श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसेल यांच्यावर, तर गोलंदाजीची रसेलसह टीम साऊदी, सुनील नरिनवर भिस्त आहे.
‘वेळ : सायं. ७.३० वा.’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १
Belgaum Varta Belgaum Varta