Friday , October 18 2024
Breaking News

विराट कोहली ठरला ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’

Spread the love

 

मुंबई : भारतीय फलंदाज विराट कोहली ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ बनला आहे. विराटने 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. विराट कोहलीने चौथ्यांदा हा किताब पटकावलाय. 2012, 2017 आणि 2018 मध्येही विराट ‘आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’ बनला होता. विराट कोहलीने दिमाखदार कामिगिरीची मालिका सुरुच ठेवली आहे. विराटच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 2023 च्या विश्वचषकात सलग 10 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली होती.

वर्ल्डकपमध्ये दिमाखदार कामगिरी
मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये विराटने दिमाखदार कामगिरी केली. त्याने 27 सामन्यांमध्ये 1377 धावा केल्या. एवढेच नाही तर विराटने गेल्या 7 वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर गोलंदाजी करत विकेट देखील पटकावली. सलग 3 वर्षे विराटला एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यानंतर विराटला टीकेला सामोरे जावे लागले होते. एकेकाळी विराट भारतीय संघाचा भाग कशामुळे? असा सवालही उपस्थित करण्यात येत होता. मात्र, विराटने 2022 मध्ये विराटने जोरदार पुनरागमन केले. 2023 च्या विश्वचषकात विराटने जोरदार फटकेबाजी केली. विराटने वर्ल्डकपमध्ये 11 सामने खेळत 765 धावा केल्या. एवढेच नाही तर त्याने सचिन तेंडुलकरचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.

वनडेमध्ये 50 शतकं ठोकणारा एकमेव फलंदाज
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम आहे. विराटने वनडेमध्ये 50 शतके ठोकली आहेत. यापूर्वी सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं ठोकली होती. विराटने आता 292 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 280 डावांमध्ये त्याने 13848 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर वनडेमध्ये 50 शतकं तर 72 अर्धशतकं आहेत.

पॅट कमिंस आयसीसी मेंस क्रिकेटर ऑफ द ईयर
ऑस्ट्र्लियाचा कर्णधार पॅट कमिंसला आयसीसी मेंस क्रिकेटर ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅट कमिंसच्या नेतृत्वाखाली कांगारुंनी 2023 चा विश्वचषक आपल्या नावावर केला होता. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा हा विश्वचषक जिंकला. त्यामुळेच पॅट कमिंसला हा अवार्ड देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

सर्वांत जास्त आयसीसी अवार्ड जिंकणारे खेळाडू
विराट कोहली – 10
कुमार संगकारा – 4
एम एस धोनी – 4
स्टीव्ह स्मिथ – 4
मिचेल जॉनसन – 3

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *