Friday , November 22 2024
Breaking News

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेऑफ्सच्या आशा कायम; चेन्नईचा राजस्थानवर ५ गडी राखून विजय

Spread the love

 

एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल २०२४ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर ५ विकेटसनी मात करत प्लेऑफ्सच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे राजस्थान रॉययल्सच्या अडचणी काही प्रमाणात वाढल्या आहेत. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने चेन्नईसमोर १४२ धावांचे लक्ष्ये ठेवले. प्रत्युत्तरात चेन्नईने १९ षटकांत ५ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह चेन्नई घरच्या मैदानावर विजयाचे अर्धशतक पूर्ण केले.

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ५ गडी राखून पराभव करत प्लेऑफ्समध्ये पोहोचण्याचा दावा मजबूत केला. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने १८.२ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४१ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. या दरम्यान राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

चेन्नईने प्लेऑफ्सच्या शर्यतीत पोहोचण्याच्या आशा कायम
या विजयासह चेन्नईने प्लेऑफ्सच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले असून गुणतालिकेत अव्वल चारमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे, तर राजस्थानची बाद फेरी गाठण्याची प्रतीक्षा वाढली आहे. चेन्नई संघ १३ सामन्यांत ७ विजय आणि ६ पराभवांसह १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान संघ १२ सामन्यांत ८ विजय आणि ४ पराभवांसह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला असता, तर केकेआरनंतर या हंगामात प्लेऑफ्समध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ ठरला असता, परंतु चेन्नईने त्यांची प्रतीक्षा वाढवली.

राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीचा फ्लॉप शो
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सच्या बाजूने नव्हता. संघाला निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून केवळ १४१ धावांपर्यंत मजल मारता आली. यशस्वी जैस्वाल (२४ धावा) आणि जोस बटलर (२१ धावा) मोठे डाव खेळू शकले नाहीत आणि स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याचवेळी कर्णधार संजू सॅमसन १५ धावा करून बाद झाला. रियान परागने चांगली फलंदाजी करत ३५ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. ध्रुव जुरेल २८ धावा करून बाद झाला. चेन्नई सुपर किंग्जकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर तुषार देशपांडेने दोन गडी बाद केले.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *