Tuesday , March 3 2026
Breaking News

विजयानंतर पीव्ही सिंधू पुढच्या फेरीत, सायना नेहवाल पराभूत!

Spread the love

मलेशिया ओपन 2022 स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं थायलंडच्या आणि जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकाच्या पोर्नपावी चोचुवाँगचा 21-13, 21-17 असा पराभव केला. पण लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता सायना नेहवालला जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या आयरिस वांगकडून 11- 21, 17-17 असा पराभव पत्कारावा लागलाय.
पीव्ही सिंधुचा विजय
पीव्ही सिंधूची थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगशी स्पर्धा होती, पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकला. सिंधूनं पहिल्या सेटमध्ये पोर्नपावीचा सहज पराभव केला. मात्र दुसर्‍या सेटमध्ये सिंधूने पलटवार करताना कडवे आव्हान दिले, मात्र पॉर्नपावीला दुसरा सेट जिंकण्यात यश आलं नाही. सिंधूनं दुसरा सेट 21-17 नं असा जिंकला. अशाप्रकारे पीव्ही सिंधूनं सलग दोन सेट जिंकून सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
पहिल्याच फेरीत सायना नेहवालचा पराभव
दुसरीकडे, सायना नेहवाल पहिलाच सामना गमावल्यानं स्पर्धेतून बाहेर पडली. नेहवालची पहिल्या फेरीत अमेरिकेच्या आयरिस वांगशी गाठ पडली. ज्यामध्ये सायना नेहवालला 21-11, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय भारताच्या बी सुमीथ रेड्डी अश्विनी पोनप्पालाही मिश्र दुहेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं असून त्यांनचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *