मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे हृदयविकराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. 1992 मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. 13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेलेल्या शेन वॉर्ननं 145 कसोटीत 708 विकेट घेतल्या आहेत. वनडेच 194 या दिग्गजाच्या खात्यात 293 विकेट्स आहेत. ज्या क्रिकेट संघात जलदगती गोलंदाजांचा भरणा आपण आजही पाहतोय त्यात या फिरकीपटून आपला हातखंडा दाखवून दिला. त्याच्या रुपात क्रिकेट जगताने महान क्रिकेटर गमावला आहे.
Check Also
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Spread the love इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …