Saturday , October 19 2024
Breaking News

भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश

Spread the love

 

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 30 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे भारत 36 षटकंच खेळू शकला. यात 225 धावा भारताने केल्या. ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे.

सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली. शिखर अर्धशतक (58) झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला. नंतर श्रेयस (44) आणि पाठोपाठ सूर्यकुमार (8) बाद झाला. पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली. पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला. गिलने नाबाद 98 धावा केल्या असून आता वेस्ट इंडीज फलंदाजी करत असून त्यांना विजयासाठी 35 षटकांत 257 रन करायचे होते.

चहलच्या फिरकीची जादू

35 षटकात 257 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजला पहिल्या षटकातच सिराजने दोन दमदार झटके दिले. त्यानंतर काय एक-एक करत गडी बाद होते. वेस्ट इंडीजकडून कर्णधार निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या. पण इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीत कोणाचाच निभाव लागला आहे. ज्यामुळे अखेर भारकडून चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले. शार्दूल आणि सिराजने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी एक-एक विकेट घेतली. 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे. नाबाद 98 धावा ठोकणाऱ्या शुभमननला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *