Thursday , November 21 2024
Breaking News

शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ

Spread the love

 

बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला.

२८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग यांनी भारतीय चमूचं नेतृत्व केलं. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे. १९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता.

यावेळच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश करण्यात आलेला आहे. ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.

भारत १८ व्यांदा या खेळांचा भाग बनत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे.

७४ अब्ज रुपये खर्च

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ ही २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित खेळांसाठी ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *