Monday , April 20 2026
Breaking News

अनमोड नाक्यावर मुद्देमालासह मद्यसाठा जप्त

Spread the love

 

खानापूर : अबकारी खात्याने गोवा बनावटीचा मद्यसाठा अनमोड नाक्यावर जप्त केला आहे याप्रकरणी दोघांना अटक करून मोटार व मुद्देमालासह जप्त केला आहे. अन्वर पाशा व उपलूर नागेश्वराराव रेड्डी (दोघेही आंध्रप्रदेश) अशी त्यांची।नावे आहेत. गोव्याकडून आंध्रप्रदेश कडे जात असलेल्या मोटारीची (टीएस 8 जीएस 9989) अनमोड नाक्यावर तपासणी केली असता त्यात 66 लिटर मद्यसाठा सापडला. याप्रकरणी वरील दोघांना अटक करून व मद्यसाठा जप्त करण्यात आला. मोटारीसह मुद्देमालाची किंमत 5 लाख 74 हजार 436 रुपये भरते. कारवाईत उपनिरीक्षक टी. बी. मल्लनावर, यू. एन. तुळजी, आर. एन. नाईक. व बाळकृष्ण कुपुस्वामी यांनी सहभाग घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

रौडीशीटरची शांतता बैठकीत हजेरी; काँग्रेसची नाराजी..

Spread the love  खानापूर : खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या शांतता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *