Tuesday , March 3 2026
Breaking News

भारत-पाकिस्तान आज ‘महामुकाबला’; कॉमनवेल्थ स्पर्धेत भिडणार

Spread the love

 

एजबॅस्टन : भारतीय महिला क्रिकेट संघ आज (दि. 31) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे. एजबॅस्टन येथील मैदानावर हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पहिला विजय नोंदवायचा आहे. खरेतर दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पहिल्याच सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव झाला. पाकिस्तानलाही शुक्रवारी बार्बाडोसविरुद्ध 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकसाठी भारताविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे. मात्र, आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताचे पारडे जड आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 11 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 9 भारताने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 2 जिंकले आहेत. आजचा सामना सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. भारतात या सामन्याचे प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क तसेच डेपूङखत अ‍ॅप आणि वेबसाइटवर होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *