उच्च न्यायालयाने अंजुमनचा अर्ज फेटाळला
बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने शुक्रवारी (ता. १५) हुबळीतील वादग्रस्त इदगाह मैदानावर गणेशमूर्ती आणि गणेश चतुर्थी उत्सवाच्या स्थापनेविरोधात अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली.
हुबळी-धारवाड महानगरपालिकेने इदगा मैदानावर गणेशमूर्ती बसवण्यास परवानगी दिलेल्या ठरावाविरोधात अंजुमन-ए-इस्लामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ईदगा मैदानात गणेशमूर्ती बसविण्यास परवानगी देण्याचा ठराव महापालिकेने संमत केला आहे. मात्र, नुकताच पदभार स्वीकारलेल्या पालिका आयुक्तांनी गणेश प्रतिष्ठापनेला परवानगी दिली नाही. आयुक्तांच्या या कारवाईचा भाजपकडून निषेध करण्यात येत आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळीच्या इदगा मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी दिली होती. यावेळीही उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे मैदान हुबळी-धारवाड महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि ती जागा ज्याला हवी असेल त्याला देता येते.
अंजुमन संघटनेचा अर्ज फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
भाजप आमदार महेश टेंगीनकाई आणि श्रीराम सेना प्रमुख प्रमोद मुतालीक यांच्यासह अनेकांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला.
Belgaum Varta Belgaum Varta