Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज; 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर

Spread the love

 

बंगळुरू : कर्नाटक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीतही झाले आहे. दरम्यान, 13 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
किनारपट्टी लगतचे जिल्हे आणि अनेक उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये आज आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उडुपीसह 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर दक्षिण कन्नड, गदग, बागलकोटसह 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. बेळगाव, बिदर, रायचूर, कोप्पळ, कलबुर्गी, यादगिरी जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल.
बंगलोर ग्रामीण, बंगळुरू शहर, चामराजनगर, चित्रदुर्ग, दावणगेरे, मंड्या, म्हैसूर, रामनगर, तुमकूर, बेळ्ळारी, विजयनगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल.

About Belgaum Varta

Check Also

अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स

Spread the love  बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *