बंगळुरू : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पावसामुळे हावेरी, शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
कलबुर्गी, रायचूर, यादगिरी, दावणगेरे जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, चिक्कबल्लापूर, चामराजनगर, चित्रदुर्ग, रामनगर, तुमकूर, विजयनगर, म्हैसूर, मंड्या, कोलार जिल्ह्यांत पाऊस पडेल.
बंगळुरूमध्ये सकाळी ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.