बंगळुरू : म्हैसूर येथील अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजी (९०) यांची मठाच्या आवारात शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.
म्हैसूरमधील सिद्धार्थनगरजवळ बन्नूर रस्त्यावरील अन्नदानेश्वर मठाच्या आवारात आज हे कृत्य घडले आणि संपूर्ण राज्य हादरले.
आरोपी रवी (६०) याला पोलिसांनी अटक केली आहे. ते स्वामीजींचे सहाय्यक म्हणून काम करत होते. हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेवरून झालेला वाद असल्याचे कारण सांगितले जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नझरबाद पोलीस तपास करत आहेत.