बंगळूर : शिमोगा येथे शनिवारी दोन मोटारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शिमोगा तालुक्यातील मुद्दीनकोप्प ट्री पार्क येथे लायन सफारीजवळ हा अपघात झाला.
शिमोगाहून सागरकडे जाणारी इनोव्हा मोटामर आणि सागरहून शिमोग्याच्या दिशेने येणारी स्विफ्ट मोटार यांच्यात धडक होऊन दोन्ही मोटारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात मोटारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले.
मृत हे चित्रदुर्ग जिल्ह्यातील चल्लाकेरे तालुक्यातील दोड्डेरी गावचे असून ते शिमोगा येथील सिगंदूर येथून परतत होते.
जखमींना शिमोगा येथील मेगन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुणसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
रस्त्यावर विखुरलेल्या गाड्यांचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. अतिवेग हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta