बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे डोंगराळ भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
पाऊस सतत पडत असून 21 आणि 22 जुलै रोजी हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
किनारपट्टी आणि पर्वतीय भागात मान्सून सुरू राहील. आज (21 जुलै) किनारपट्टी, उत्तरेकडील भागात आणि दक्षिणेकडील भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, शिमोगा, कोडगु, चिक्कमंगळुरू जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये २१ आणि २२ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
उडुपी जिल्ह्यात सरासरी 151 मिमी आणि करकला 202 मिमी आहे. हेब्रीमध्ये 169 मिमी, कुंदापूर 125 मिमी, उडुपी 131, बयंदूर 114, ब्रह्मावर 137 मिमी, कापू तालुक्यात 177 मिमी पाऊस पडला आहे.
मुसळधार पावसामुळे अंकोला, उत्तर कन्नड येथे रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यास अडचण निर्माण होत आहे आणि कुमठा येथेही डोंगर कोसळले आहेत. दक्षिण कन्नड, उडुपी, शिमोगा, कोडगु, हसनसह अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.