बेंगळुरू : राज्य सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत आणि शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या पत्नी शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या पुढील मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या पुढील मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यमान मुख्य सचिव रजनीश गोयल पाच दिवसांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शालिनी रजनीश यांची नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची माहिती एच. के.पाटील यांनी दिली. यासोबतच पतीच्या निवृत्तीनंतर तेच पद पत्नीकडे जाणार आहे.