Tuesday , September 17 2024
Breaking News

खर्गे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप

Spread the love

 

 

बंगळुरू : काही दिवसांपूर्वीच कथित मुडा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता मल्लिकार्जुन खर्गे यांचे कुटुंबिय सदस्य असलेल्या संस्थेला कर्नाटक सरकारने उद्योगांसाठी राखीव असलेली जमीन दिल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाची एरोस्पेस पार्कसाठी राखीव असलेली जागा चुकीच्या पद्धतीने मल्लिकार्जुन खर्गे यांच्या परिवारातील सदस्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या सिद्धार्थ विहारा या संस्थेला दिली असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार लहरसिंग सिरोया यांनी यासंदर्भातील एक बातमी शेअर करत आरोप केले आहेत. “हा सत्तेचा दुरुपयोग किंवा घराणेशाहीचा वापर आहे का? उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी या जमीन हस्तांतराला मंजुरी दिली कशी? खर्गे यांचा परिवारही आता एरोस्पेस उद्योजक झाला का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पुढे बोलताना, याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली असून याची चौकशी केली जाईल”, असंही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात कर्नाटकचे औद्योगिक मंत्री एम. बी. पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. “मल्लिकार्जुन खर्गे यांचे पूत्र राहुल खर्गे यांच्या संस्थेला जी जमीन देण्यात, ती नियमानुसार देण्यात आली आहे. त्यांना कोणतीही सुट करण्यात आलेली नाही. राहुल खर्गे आयआयटी पदवीधारक आहेत. त्यांना या ठिकाणी मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारायचे आहेत. नियमानुसार, औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असलेला काही भूखंड शैक्षणिक उद्देशांसाठी वापरता येऊ शकतो”, असे ते म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक काँग्रेसने एक निवेदन जारी करत भाजपा खासदाच्या आरोपांचे खंडन केलं. “भाजपाचे खासदार लहरसिंग सिरोया यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मुळात भाजपाच्या ज्या खासदारांनी हे आरोप केले आहेत. ते स्वत: स्थलांतरीत आहेत. ते मुळचे कर्नाटकचे नसून राजस्थानचे आहेत. त्यामुळे आधी त्यांनी कर्नाटकमधील त्यांच्या मालमत्तेची माहिती द्यावी. अशाप्रकारे खोटे आरोप करून भाजपाने पुन्हा त्यांची दलित विरोधी मानसिकता दाखवून दिली आहे”, असं प्रत्युत्तर कर्नाटक काँग्रेसकडून देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

भाजप काळातील घोटाळ्यांच्या चौकशीला गती देणार

Spread the love  जी. परमेश्वर; आठवडाभरात मंत्री समितीची बैठक बंगळूर : मागील भाजप सरकारच्या काळात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *