चौकशीला आज उपस्थित रहाण्याची सूचना
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणाचा तपास करणाऱ्या लोकायुक्त पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांचे भाऊ मल्लिकार्जुन आणि देवराजू यांना नोटीस बजावली आहे.
म्हैसूर लोकायुक्त पोलिसांनी मुडा प्रकरणाबाबत लोकप्रिनिधी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवून तपास केला आहे.
एफआयआरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पहिला आरोपी, त्यांची पत्नी पार्वती यांना दुसरा आरोपी म्हणून, पार्वती यांचा भाऊ मल्लिकार्जुन स्वामी हे तिसरे आरोपी म्हणून आणि जमीन मालक देवराजू यांना चौथा आरोपी म्हणून नाव नोंद करण्यात आले आहे.
या प्रकरणात, आरोपी ए १, ए २ आरोपीना वगळून लोकायुक्त पोलिसांनी ए ३, मल्लिकार्जुन स्वामी आणि ए ४ देवराजू यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उद्या (ता. १०) सुनावणीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुडाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना १४ भूखंडांचे बेकायदेशीरपणे वाटप केले. स्नेहमाई कृष्णा या सामाजिक कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधी न्यायालयात याप्रकरणी चौकशी करण्यासाठी तक्रार केली होती.
या तक्रारीवर सुनावणी करणाऱ्या लोकप्रतिनिधी न्यायालयाने लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आणि २४ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार म्हैसूर लोकायुक्त पोलिसांनी तपास केला. आता तपासाला वेग आला असून मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू यांना सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर नोंदवताना, सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी त्यांना दिलेले १४ भूखंड मुडाला परत केले, परंतु लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आणि दोन आरोपींना नोटिसा बजावल्या.
काही दिवसांपूर्वी लोकायुक्तांनी म्हैसूरच्या विजयनगरमध्ये सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना दिलेल्या जागेला भेट देऊन जागेची पाहणी केली होती.