Monday , December 8 2025
Breaking News

मुनिरत्ननने दोन माजी मुख्यमंत्र्यांना अडकविले हनीट्रॅपच्या जाळ्यात

Spread the love

पीडितेकडून स्फोटक माहिती; संरक्षण दिल्यास व्हिडिओ देण्याची ग्वाही

बंगळूर : माजी मंत्री आणि आमदार मुनीरत्न यांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅप करून मंत्रीपद मिळविल्याचा आरोप मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या पिडीत महिलेने केला आहे. जर सरकाने मला सुरक्षा दिली तर मी माजी मुख्यमंत्र्यांची नावे आणि संबंधित व्हिडिओ देईन, असेही ती म्हणाली. महिलेवरील अत्याचाराच्या आरोपाखाली मुनिरत्न सध्या कारागृहात आहेत.
बंगळुर येथे एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पीडित महिला म्हणाली की, दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिपद मिळवण्यासाठी हनीट्रॅप करण्यात आले आणि छळ करण्यात आला. मुनीरत्नकडे अतिशय प्रगत कॅमेरे आहेत, जे इतर कोणत्याही माध्यमात नाहीत. आमच्या सारख्या असाह्य महिलांचा वापर करून दोन माजी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांना त्यांनी हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकविले हनीट्रॅप व्हिडिओ बनवला. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही हनीट्रॅप झाले आहेत. एसीपी, सीपीआयचे अधिकारी हनीट्रॅप झाले आहेत. माझे आणि मुनीरत्न यांचे ब्रेन मॅपिंग करावे असे आव्हान या पीडितेने महिलेने अश्वत्थ नारायण व विरोधी पक्षनेते आर. अशोक यांना दिले आहे.
माझ्याकडे योग्य ते पुरावे आहेत. मी एसआयटीला देण्यास तयार आहे. मात्र सरकारने सुरक्षा देण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असे ती म्हणाली. मुनीरत्नांनी स्वतः मला त्यांचा मोबाईल देऊन पाठवला. त्यांचे निकटवर्तीय सुधाकर यांच्यामार्फत हनीट्रॅप करण्यात आला, असे ती म्हणाली.
याची माहिती मी गोळा केली आहे. मला माझा वैयक्तिक मोबाईल वापरता येत नाही. मला धमकावून हनीट्रॅप केल्याचे पुरावे आहेत. मी स्वतः हनीट्रॅप केलेला नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सत्यापासून दूर असल्याचे ती म्हणाली.
माझ्या आयुष्यात काही अडचण आली तर त्याला थेट मुनीरत्न जबाबदार असतील. तक्रार मागे घेण्याची धमकी देत ​​आहेत. याबाबत मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे तिने सांगितले.
त्यांनी माझा हनीट्रॅपिंगसाठी वापर केला नाही, त्यांनी इतर महिलांचा वापर केला. त्यात चित्रपट अभिनेत्री नाहीत. हनीट्रॅपसाठी वापरण्यात आलेल्या सुमारे पाच-सहा पीडित महिला आता घाबरून गप्प आहेत. माझ्यासारखा त्या बाहेर आल्या तर सर्व सत्य बाहेर येईल, असे ती म्हणाली. माजी मुख्यमंत्री आणि अनेक राजकीय नेत्यांना हनीट्रॅप करण्यासाठी आमदार मुनीरत्न यांनी अनेक महिलांचा वापर केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. विजयेंद्र यांनी दहा मिनिट भेटण्याची वेळ द्यावी, त्यांच्याशी दहा मिनिटे बोलायचे आहे. या सर्व प्रकारानंतर मुनीरत्न यांना पक्षात का ठेवले आहे, हे विचारायचे आहे, असे ती म्हणाली.
एड्स रुग्णांचा वापर
मुनीरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून हनीट्रॅप केले. त्यात आमदार, पोलीस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. सुमारे २० ते ३० राजकीय नेत्यांना हनीट्रॅप करून पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आल्याचे पीडितेने सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *