बंगळूर : जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाच्या नेत्रदीपक जंबोसावरी मिरवणुकीला आज (१२ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. ऐतिहासिक विजयादशमीच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी जंबो सवारीच्या मिरवणुकीचा शुभारंभ म्हैसूर पॅलेसच्या आवारात सुवर्ण अंबरीत सर्वांलंकार परिधान करून विराजमान झालेल्या श्रीचामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात येईल.
शनिवारी दुपारी ४ ते ४-३० दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या जंबो सावरीच्या मिरवणूकीला चालना देतील.
म्हैसूर दसरा महोत्सव जंबो सवारीच्या मिरवणुकीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या अंजनेय स्वामी मंदिराजवळ ऐतिहासिक विजयादशमीच्या मुहूर्तावर नंदीध्वजाचे पूजन करून प्रारंभ करतील. नंतर, दुपारी ४ ते ४-३० दरम्यान होणाऱ्या शुभ कुंभ लग्नादरम्यान, मुख्यमंत्री राजवाड्याच्या आवारात सोन्याच्या अंबारित स्थापित श्रीचामुंडेश्वरी देवीच्या उत्सवमूर्तीला पुष्पहार अर्पण करतील.
या दसरा मिरवणुकीत ५० चित्ररथ सहभागी होणार आहेत. यासोबतच ६० हून अधिक लोककला मंडळे विजयादशमी मिरवणुकीत शासकीय उपलब्धी, हमी योजना, संविधानिक लोकशाही, पर्यटन स्थळे, धार्मिक केंद्र, आदिवासी वारसा अशा विविध स्थिर प्रतिमा सादर करणार आहेत.
सोन्याची अंबारी घेऊन जाणाऱ्या अभिमन्यू (हत्ती)ला पोलिस वाद्याचे अश्वदळ साथ देईल. त्यापोठोपाठ लक्ष्मी आणि हिरण्य साथ देतील. त्यांच्यासोबत केएसआरपीची तुकडी, राजवाड्याचे प्रतीक, डोल्लू कुणीत, पटाडा कुणीत, वीरगासे, करडी कुणीत आदी परेडमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
राजवाड्यातून निघणारी जंबो सवारी मिरवणूक उत्तर गेटमार्गे केआर सर्कल, सयाजीराव रोड, शासकीय आयुर्वेद सर्कलपर्यंत जाईल. ती बंबू बारजा, हायवे सर्कल पार करून सायंकाळी पणजीना परेड मैदानावर पोहोचेल. त्याच दिवशी संध्याकाळी बन्नीमंटप मैदानावर एक रोमांचक पणजीना परेडही होणार आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राजघराण्याचे वंशज असलेले खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वडेयर, जिल्हा पालक मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा, मंत्री शिवराज तंगडगी, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत रेड्डी, शहर पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांच्यासह इतर कॅबिनेट मंत्री, आमदार आणि खासदार सहभागी होणार असून अनेक अधिकारी आणि मान्यवरही सहभागी होणार आहेत.
संध्याकाळी, म्हैसूरच्या बन्नीमंटप मैदानावर होणाऱ्या रोमांचक परेड कार्यक्रमात, राज्यपाल थावरंचंद गेहलोत परेडचे निरिक्षण करतील आणि सलामी स्वीकारतील. सोमण्णा यांच्यासह राज्याचे मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.