गदग : आपल्या कोवळ्या तीन मुलांना नदीत फेकून पित्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गदग येथे घडली.
वेदांत (३), पवन (४), धन्या (६) आणि वडील मंजुनाथ अशी मृतांची नावे आहेत. मंजुनाथने प्रथम आपल्या तीन कोवळ्या मुलांना गदग जिल्ह्यातील मुंदरगी तालुक्यातील कोरलाहळी गावाजवळ तुंगभद्रा नदीत फेकले. त्यानेही स्वतः नदीत उडी आत्महत्या केली.
याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून तुंगभद्रा नदीतून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.