सिध्दरामय्या; भाजपचा आरोप खोटा
बंगळूर : राज्य सरकार बीपीएल कार्ड रद्द करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला असून केवळ अपात्र बीपीएल कार्डे रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात हमीयोजनासाठी निधी नसल्यामुळे बीपीएल कार्ड कापले जात असल्याचा भाजपचा आरोप फेटाळून लावत ते म्हणाले, आम्ही अपात्र बीपीएल कार्डे परत घेतली आहेत. पात्र कार्डांची कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ अपात्र बीपीएल कार्डे रद्द केली जात आहेत, पात्र लोकांची बीपीएल कार्डे रद्द करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून भाजपचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. अपात्र व्यक्तींचीच बीपीएल कार्डे परत घेतली जात आहेत, पात्र लाभार्थ्यांची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयकर भरणारे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बीपीएल कार्ड द्यायचे का? असा प्रश्न करून, सर्वच बीपीएल कार्डे रद्द केली जाणार नाहीत. अपात्रांकडून बीपीएल कार्डे परत घेतलेली आहेत, त्याचा तपास अन्न विभाग करत आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पात्र लाभार्थ्यांचे बीपीएल कार्ड रद्द केले जाणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
जे बीपीएल कार्डसाठी पात्र आहेत त्यांना सुविधांपासून वंचित राहू नये म्हणून अपात्र व्यक्तींची कार्डे रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. सर्वांची बीपीएल कार्डे रद्द होत असल्याचे सांगून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, हे खोटे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कमिशन आरोप पुराव्याअभावी सिध्द नाही
मागील भाजप सरकार ४० टक्के कमिशनच्या आरोपातून मुक्त असल्याच्या आर. अशोक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “आम्ही कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशीची सूचना केली होती. पुराव्याअभावी आरोप सिद्ध झाले नाहीत. खुनाच्या गुन्ह्यांमध्येही काही वेळा पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात. खून झालाच नाही असे कसे होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी केला.
भाजपने राज्यात ऑपरेशन कमल राबविण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला असे सांगून भाजप काँग्रेस आमदारांना आमिष दाखवत असल्याचा दावा त्यांनी अप्रत्यक्षपणे केला.
Belgaum Varta Belgaum Varta