प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना जोरदार झटका
बंगळूर : भाजपचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने आजपासून सीमावर्ती बिदर जिल्ह्यात पाच जिल्ह्यांमध्ये वक्फविरोधात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ‘वक्फ हटाओ भारत देश बचाओ’ या घोषणेखाली संघर्ष सुरू झाला.
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपचा दारुण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या असंतुष्ट गटाने प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना जोरदार झटका देत वक्फविरोधातील लढा तीव्र केला आहे.
वक्फविरोधात लढा पुकारल्यानंतर काही तासांतच विजयेंद्र यांनी वक्फविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आणि यासाठी तयार केलेल्या तुकड्यामध्ये यत्नाळ गटाचा समावेश केला होता. मात्र यत्नाळ यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात जाऊन बिदरमध्ये वेगळा संघर्ष सुरू केला आहे.
विजयेंद्र यांनी नुकतीच दिल्लीला भेट देऊन नाराज नेत्यांवर कारवाई करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती. मात्र त्याला दाद न देता यत्नाळ गटाने यासाठी वेगळा संघर्ष सुरू केला आहे.
वक्फविरोधातील मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत ५ जिल्ह्यांत चालणार आहे. ९ डिसेंबरपासून बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वक्फमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख करण्याचा प्रस्ताव आहे.
या मोहिमेत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, अरविंद लिंबवळी, नेते कुमार बंगारप्पा, माजी खासदार प्रतापसिंह, जी. एम. सिद्धेश्वर, होळकरे चंद्रप्पा, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजकीय सल्लागारासह इतर नेते रिंगणात उतरले आहेत.
या लढ्यापूर्वी यत्नाळ यांनी बिदर शहरातील उग्र नरसिंह मंदिरात विशेष पूजा करून वक्फविरोधात मोहीम सुरू केली. वक्फचा प्रश्न असेल तर मला सांगा, जनतेने जागे व्हावे, असे माजी मंत्री अरविंद लिंबवळी यांनी बिदर येथील नरसिंह झरणा मंदिरात भेट देऊन वक्फ विरुद्ध जनजागृती सुरू केल्याचे सांगितले.
विजापूर जिल्ह्यात वक्फ घोटाळ निदर्शनास येताच यत्नाळ यांनी आंदोलन केले, आंदोलनाचा भाग म्हणून जाहीर सभाही घेतली. त्यांनी रात्रंदिवस लढा दिला. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनीही त्यांच्या आंदोलनात भाग घेतला होता. वक्फ संयुक्त संसदीय मंडळाचे अध्यक्षही येऊन याचिका घेऊन गेले. आम्ही केवळ माहितीच नाही तर जनजागृतीही केली आहे. आज आम्ही धर्मपुर आणि चटनाहळ्ळीला भेट दिली. वॉर रूम येताच आम्ही जनजागृती करत आहोत, असे लिंबावळी म्हणाले.
ईश्वरसिंह ठाकूर यांनी स्थानिक पातळीवर लढा दिला असून, वाद निर्माण करण्याऐवजी आम्ही लोकांच्या समस्या ऐकून घेण्यास तयार आहोत. लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी सर्वांनी स्थानिक पातळीवर एकत्र येऊन जनजागृती करणार आहोत, असे ते म्हणाले.
अधिकृत कार्यक्रम नाही
भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या गटाने वक्फ बोर्डाच्या विरोधात सुरू केलेल्या लढ्याला भाजपचे आमदार पाठिंबा देण्यास तयार नाहीत. कारण हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम नाही. पक्षाकडून कोणताही संदेश आलेला नाही. त्यामुळे त्यात भाजप आमदारांचा सहभाग कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदार शरणू सलगार, डॉ. सिद्धू पाटील, डॉ. शैलेंद्र बेलदाळे यांनी यापूर्वीच खुलासा केल्याचे सूत्रांनी सांगितले.