बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती बी. एम. यांच्या मुडा घोटाळ्याला एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरुद्ध दिवाणी खटला दाखल केल्याने नवीन वळण लागले आहे.
म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने म्हैसूरच्या केसरे गावात पार्वती बी. एम. यांनी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला १४ भूखंडांचे वाटप केले होते. मात्र बेकायदेशीर भूखंड वाटपाचा आरोप झाल्यानंतर पार्वती यांनी १४ भूखंड मुडाला परत केले.
केसरे येथील जमीन पार्वती यांना त्यांचा भाऊ मल्लिकार्जुनस्वामी यांनी भेट म्हणून दिली होती. ही जमीन मल्लिकार्जुनस्वामी यांनी देवराजूकडून विकत घेतली होती.
आता देवराजूचा मोठा भाऊ मैलारैया याची मुलगी जमुना हिने म्हैसूरच्या जेएमएफसी कोर्टात प्रकरण दाखल केले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या नावावर असलेली जमीन देवराजू यांची नसून आमचे वडील मैलारय्या यांच्या नावावर असल्याचा दावा जमुना यांनी केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्नी पार्वतीसह १२ जणांवर दिवाणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी जमुनाने पार्वतीकडून मुडाने घेतलेल्या जमिनीवरही आपला हक्क असल्याचा दावा केला.
आमचे काका देवराज यांनी फसवणूक करून जमीन विकली. ही जमीन पूर्वी माझ्या वडिलांच्या नावावर होती. आमचे काका देवराजू यांनी आमच्या नावावर करणार असल्याचे सांगून माझी व माझ्या आईची सही घेतली, अशी तिने तक्रार केली आहे.