
कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील या प्रकरणाची सध्या गावभर चर्चा होत आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील अफझलपुर तालुकाच्या कातादरगी भागात भाग्यवंती मंदिर आहे. मंदिरातील व्यवस्थापनाने दानपेटीतील रकमेची मोजणी सुरू केली होती. दानपेटीत २० रूपये सापडले. २० रूपयामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ‘माझ्या सासूचा लवकर मृत्यू होऊ दे’ असे लिहिलेले आढळले.
भाग्यवंती देवीकडे नवस मागितला
भाग्यवंती मंदिरातील दानपेटीतील रक्कमेची दर महिन्याला मोजणी होते. मंदिराची दानपेटी उघडून नोटा मोजल्या गेल्या. तसंच किती तोळे सोने – चांदी दान करण्यात आले, याची माहिती देण्यात येते. भाग्यवंती मंदिर हे कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर. या मंदिरात भावीक लाखो रूपये आणि दागिने दान करतात. पण या सगळ्यात २० रूपये नोटाची चर्चा होत आहे. ज्यात एका व्यक्तीने आपल्या सासूचा मृत्यू होवो. असे जणू साकडं देवीकडे घातले आहे. मंदिराच्या दानपेटीत मोजणी केली असता, ६० लाख रूपये रोख, १ किलो चांदी आणि २०० तोळे सोन्याचे दागिने दान करण्यात आले. मात्र, या सगळ्यात २० रूपयाच्या नोटीने सर्वांचच लक्ष वेधून घेतले आहे. खरंतर लोक आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. साकडं घालतात. मात्र, अज्ञात व्यक्तीने आपल्या सासूच्या मृत्यूची प्रार्थना केली आहे. ज्याची चर्चा कर्नाटकात होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta