Monday , December 8 2025
Breaking News

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची शस्त्रेही जप्त

Spread the love

 

कोप्पा तालुक्यातील मेगुरु जंगलात सापडली शस्त्रे

बंगळूर : नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या सहा नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.
नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या सततच्या शोधानंतर पोलिसांना चिक्कमंगळूर येथील मेगुरुच्या जंगल परिसरात सहा बंदुका आणि दारूगोळा सापडला. त्याचप्रमाणे एक एके-५६, तीन ३०३ रायफल, बारा बोअर एसबीबीएल, एक घरगुती बंदूक सापडली. ७.६२ मिमी एके दारुगोळा-११, ३०३- रायफल दारुगोळा – १३३, १२ बोअर काडतुसे – २४, घरगुती पिस्तूल दारुगोळा – ८ एकूण १७६ दारुगोळा, एके-५६ रिकामी मॅगझिन – ०१ जप्त करण्यात आला
जयपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम आमटे यांनी सांगितले की, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५१ (१) (ब), ७ आणि २५ (१ अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मुख्य प्रवाहात आलेले नक्षलवादी त्याच मेगुरुच्या जंगलातून बाहेर आले. पोलिसांच्या पथकाने मेगुरुच्या जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली होती जिथे नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यांची शेवटची बैठक घेतली होती. कोप्पा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रे जप्त केली.
बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गृह कार्यालयात आत्मसमर्पण केलेल्या सहा नक्षलवाद्यांनी शस्त्रे समर्पण केली नाहीत. त्यांनी प्रतिकात्मकपणे त्यांचा हिरवा गणवेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे सुपूर्द केला आणि शरणागतीची घोषणा केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे गुलाबपुष्प आणि भारतीय संविधानाच्या प्रती देऊन मुख्य प्रवाहात स्वागत केले.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे माओवादी चळवळ संपवणे हेच उद्दिष्ट असून, सर्व आंदोलने शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने व्हावीत, हीच त्यांच्या सरकारची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या बंदुका जप्त करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.
शस्त्रास्त्रांसाठी पॅकेजची घोषणा
दरम्यान, राज्य सरकारने माओवाद्यांना आत्मसमर्पण केलेल्या शस्त्रास्त्रांसाठी पॅकेज, एके-४७ रायफलसाठी 30 हजार रुपये; युपीएम, जीपीएम, आरपीजी, स्निपर रायफलसाठी ५० हजार; स्निपर क्षेपणास्त्रासाठी ४० हजार; प्रति ग्रेनेड दोन हजार; रिव्हॉल्व्हर/पिस्तूलसाठी १० हजार; रॉकेट लाँचरसाठी तीन हजार; सूत्रांनी सांगितले की एक किलो स्फोटकांसाठी चार हजार रुपये, सॅटेलाइट फोनसाठी २० हजार रुपये आणि प्रत्येक जिवंत बुलेटसाठी १०० रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
भाजपची टीका
नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणावर विरोधी पक्षाने भाजप सरकारवर टीका करत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची शस्त्रे जप्त करण्याची तसदी घेतली नाही, अशी टीका केली. या घडामोडीवर भाष्य करताना भाजपचे आमदार सी. टी. रवी म्हणाले की, आत्मसमर्पण करणाऱ्यांनी त्यांच्या शस्त्रांशी संबंधित सर्व तपशील द्यावा.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना त्यांच्या शस्त्रास्त्रांची माहिती दिल्यानंतरच आत्मसमर्पण आणि पुनर्वसन पॅकेज देण्यात यावे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना शस्त्रे कोणी पुरवली याचीही माहिती द्यावी. तपासात पूर्ण सहकार्य असेल तरच पॅकेज देण्यात यावे. माओवाद्यांनी पोलीस, सैनिक आणि सामान्य लोकांची हत्या केली आहे. त्यांनी आपल्या सपोर्ट बेसची माहिती द्यावी असे सांगितले.
तसंच रवी यांनी सरकारलाही विनंती केली की, “मला वाटतं नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण हा एक डावपेच आहे. त्यांनी आपली विचारधारा आणि हिंसाचार पूर्णपणे सोडला आहे की नाही याची पुष्टी व्हायला हवी. आत्मसमर्पण केलेल्या सहा माओवाद्यांपर्यंत तपास मर्यादित ठेवू नये.”
गृहमंत्र्यांकडून समर्थन
भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, ‘शरण आलेल्या माओवाद्यांनी त्यांची शस्त्रे जंगलात फेकल्याचे मानले जाते आणि पोलिस त्यांचा शोध घेण्याचे काम करत आहेत. माओवाद्यांच्या पुनर्वसनात जी बांधिलकी दाखवली आहे ती सरकार शस्त्रास्त्रे शोधण्यात दाखवत नसल्याच्या भाजपच्या आरोपावर त्यांनी ‘आम्ही आमचं काम करत आहोत’ असं म्हणत सरकारच्या या निर्णयाचा बचाव केला.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *