रायचूर : राज्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या दोन भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. यल्लापूरमध्ये लॉरी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला, तर रायचूरमध्ये क्रुझरच्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
रायचूरच्या सिंदनूर तालुक्यातील अरगिनमर कॅम्पजवळ भीषण अपघात झाला. क्रुझरचे टायर फुटून वाहन रस्त्याच्या मधोमध पलटली. या अपघातात मंत्रालय संस्कृत पाठ शाळेतील तीन विद्यार्थी आणि क्रुझर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
चालक शिवा (24), विद्यार्थी अय्यवंदन (18), सुजेंद्र (22) आणि अभिलाष (20) अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिंदनूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सिंदनूर वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta