
बेळगाव : उडुपी येथील एका अज्ञात व्यक्तीने 5 वर्षांच्या बालिकेचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश उडुपी जिल्हा पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहेत.
अपघातात जखमी झालेल्या व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घटनेची माहिती घेतली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात यावा. याशिवाय, मंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींना मुलीला आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना दिल्या.


Belgaum Varta Belgaum Varta