शिवमोग्गा : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर अद्याप पडदा पडल्याचं चित्र नाही. दिवसेंदिवस कट्टर समूहांकडून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रकार सुरू असून यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात आणखी तणाव वाढला. या 26 वर्षांच्या कार्यकर्त्याने हिजाब प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर काही मजकूर प्रसिद्ध केला. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कलम 144 लागू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिलीय.
काही लोक बाईकवर आले आणि त्यांनी हर्षवर धारदार शस्त्राने वार केल्याचं प्रत्यक्षदर्शींना सांगितलं. हत्येनंतर संतप्त लोकांनी परिसरात जोरदार तोडफोड केली. गाड्या पेटवल्या. हा गोंधळ वाढत असल्याचे पाहून शिवमोग्गामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना 23 फेब्रुवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
’कोणी मारलं माहिती नाही…’
4-5 तरुणांच्या टोळक्याने तरुणाची हत्या केली. यामागे कोणत्याही संघटनेचा हात असल्याची मला माहिती नाही. शिवमोग्गा येथे कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली.
Check Also
9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन
Spread the loveबेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे …