बेंगळुरू : चित्रदुर्ग येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उपसभापती रुद्रप्पा लमाणी यांना अचानक बंगळुरू येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
रुद्रप्पा लमाणी यांचा चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर तालुक्यातील जेजे हळ्ळीजवळ अपघात झाला. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना दावणगेरे येथील एसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बंगळुरू येथील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
काल रुद्रप्पा लमाणी यांनी त्यांची कार चित्रदुर्गातील जे.जे. हळ्ळीजवळ थांबवली आणि ते पाणी पिण्यासाठी कारमधून उतरले असता भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. त्यांना तात्काळ दावणगेरे रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. आता अचानक त्यांना बंगळुरू रुग्णालयात हलवण्यात आले आहे.