बागलकोट : गणवेशात असलेल्या पोलिसांनी स्वामीजींच्या पाया पडल्याने गृहविभागाने पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची अन्य शहरात बदली केल्याची घटना बागलकोट येथे घडली.
हुनगुंद तालुक्यातील सिद्दनकोळ येथील शिवकुमार स्वामीजींच्या पाया पडणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. स्वामीजी बदामी येथे आले असता तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वामीजींच्या पाया पडल्या. यावेळी स्वामीजींनी पोलिसांना पैसे देऊन आशीर्वाद दिला.
मात्र गणवेशात असलेल्या पोलिसांनी पाया पडू नये तर नमस्कार करावा, अशी सूचना स्वामीजींनी दिली. दरम्यान स्वामीजी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे बोलणे व्हायरल झाले.
बागलकोटचे एसपी अमरनाथ रेड्डी यांनी याची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई करत सहा हवालदारांच्या बदलीचे आदेश दिले.