बेळगाव (प्रतिनिधी) : हुबळी शहरात सभापती बसवराज होरट्टी यांच्या घराशेजारील एका घरावर दरोडा घालणाऱ्या दोघा दरोडेखोरांवर हुबळी पोलिसांनी गोळ्या झाडल्या. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते दोघे दरोडेखोर जखमी झाले असून त्या दरोडेखोरांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघा पोलिसांना उपचारासाठी हुबळीच्या किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी इस्पितळात जाऊन त्या तिघा जखमी पोलिसांची विचारपूस केली.