बंगळुरू : हनीट्रॅप प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकारणातील आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत बसवराज होरट्टी यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. बसवराज होरट्टी यांनी विधान परिषदेचे उपसभापती प्रणेश यांना राजीनामा पत्र पाठवून १ मे पर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारावा आणि त्यांना सभापती पदावरून मुक्त करावे अशी विनंती केली आहे.
विधान परिषदेतील सदस्यांचे वर्तन योग्य नाही असा मुद्दा उपस्थित करून बसवराज होरट्टी यांनी आज सकाळी माध्यमांना माहिती दिली होती. त्यावेळी म्हटले होते की ते विधान परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उपसभापतींना पाठवला.