Wednesday , March 4 2026
Breaking News

सणाच्या दिवशी शोकांतिका; कृष्णा नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

Spread the love

 

बागलकोट : गुढीपाडवा सणाच्या दिवशी कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. तिघेही बागलकोट तालुक्यातील इल्याळ गावातील रहिवासी आहेत.

बागलकोट जिल्ह्यातील सीतीमनी गावात ही दुर्घटना घडली. सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय १५) याचा मृतदेह सापडला असून मल्लप्पा बसप्पा बगली (वय १५), परनगौडा मल्लप्पा बिळगी (वय १७) यांचा कृष्णा नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच बागलकोट अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मच्छीमारांच्या सहकायनि शोधमोहीम राबविली असता एकाचा मृतदेह सापडला. इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

बागलकोट तालुक्यातील सितीमनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून घटनास्थळी बागलकोट सीपीआय एच. आर. पाटील यांनी पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *