
बेंगळूर : मार्च 1 ते 20 दरम्यान पार पडलेल्या कर्नाटकाच्या द्वितीय पीयूसी परीक्षांचा निकाल उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर होणार आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा हे मंगळवारी दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
दुपारी 1.30 वाजल्या विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतात आणि मार्कशीटही डाउनलोड करता येईल:
karresults.nic.in
pue.karnataka.gov.in
विद्यार्थ्यांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करावे लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta