बेंगळुरू : बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून 73.45 टक्के निकाल लागला आहे.
यामध्ये उडुपी जिल्हा 93.90 टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर यादगीर जिल्हा 48.45 टक्के निकालासह शेवटचा आला. दक्षिण कन्नड जिल्ह्याने 93.70 टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर बेळगाव जिल्ह्याची 65 टक्क्यांसह 26 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. चिक्कोडी 24 व्या स्थानी आहे.
2025 शैक्षणिक वर्षातील द्वितीय पीयूसी निकाल आज, मंगळवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी आज बेंगळुरूमध्ये निकालाची माहिती दिली.
अमुल्या कामत हिने विज्ञान शाखेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावताना 600 पैकी 599 गुण मिळवले. ती दक्षिण कन्नड येथील एक्सपर्ट पीयू कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
वाणिज्य शाखेत मंगळूर येथील कॅनरा महाविद्यालयाच्या दीपश्री हिने 600 पैकी 599 गुण मिळवले. तर कला शाखेत इंदू कॉलेजची संजना बाई हिने 600 पैकी 597 गुण मिळवले.
1 ते 20 मार्च दरम्यान राज्यभरातील 1771 परीक्षा केंद्रांवर झालेल्या बारावी परीक्षेला एकूण 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून, राज्यभरातील 76 केंद्रांवर 25 हजाराहून अधिक मूल्यांकनकर्त्यांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले. मूल्यांकन 3 एप्रिलपर्यंत पूर्ण झाले. आता निकालांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे, निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
निकाल या संकेतस्थळावर पाहता येईल
karresults.nic.in
kseab.karnataka.gov
Belgaum Varta Belgaum Varta