
हुबळी : हुबळी येथील एका ५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.
पोलिसांच्या गोळीबारात आरोपी रक्षित कांती ठार झाला. याप्रकरणी पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केल्याने त्याच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेत एक पीएसआय आणि दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta