
बंगळूर : नॅशनल हेराल्ड प्रकरण आता डीके ब्रदर्सपर्यंत येऊन पोहोचले आहे. यंग इंडियासाठी डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी. के. सुरेश यांनी २.५ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने न्यायालयात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त चार्जशीटमध्ये डीके ब्रदर्स हे नाव नमूद केले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देणगी दिली आहे. ही देणगी हायकमांडच्या सूचनेवरून देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी १४२ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप ईडीने यापूर्वी केला होता.
प्रकरण काय आहे?
सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर काँग्रेस नेत्यांनी गुन्हेगारी कट रचून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता मिळवली आहे.
यंग इंडियन लिमिटेडद्वारे २००० कोटीची मालमत्ता सोनिया आणि राहुल यांनी फक्त ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. कॉंग्रेस पक्षाने एजेएलला दिलेले कर्ज ९०.२ कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्यात आले आणि ते यंग इंडियनला हस्तांतरित करण्यात आले, असा ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख केला आहे.
देणगीचे शिवकुमारांकडून समर्थन
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राला आर्थिक मदत देण्यात काहीही गैर नसल्याचे सांगून उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बचाव केला. शुक्रवारी दुपारी विजापूर जिल्ह्यातील कोल्हारा शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, त्यांचे भाऊ डी.के. सुरेश आणि रेवंथा रेड्डी यांच्यावरील आरोपांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी वरीलप्रमाणे उत्तरे दिली.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आमच्या पक्षाचे आहे. आम्ही पक्षाच्या वृत्तपत्राला निधी दिला आहे. देण्यात काय हरकत आहे? असे सांगून त्यानी समर्थन केले.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राला आर्थिक मदत केल्याची कबुली देणाऱ्या शिवकुमार यांनी त्यात काय चूक आहे, असा पुन्हा एकदा प्रश्न केला.
Belgaum Varta Belgaum Varta