पणजी : दक्षिण गोव्यातील प्रतापनगरमध्ये एका तरुणीची तिच्याच बॉयफ्रेंडने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. हे तरुण-तरुणी बंगळुरूचे असून लग्न करण्यासाठी ते गोव्यात आले होते. पण काही कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची गळा चिरून हत्या केली. या हत्येप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. रोशनी तिचा बॉयफ्रेंड संजय केविन एससोबत गोव्याला आली होते. दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने बंगळुरूहून गोव्यात आले होते. पण परस्पर वादातून तरुणाने गर्लफ्रेंडची गळा चिरून हत्या केली आणि मृतदेह जंगलात फेकून देत पसार झाला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी बॉयफ्रेंडला अटक केली.
रोशनी आणि संजय हे दोघेही बंगळुरूचे होते. एकाच परिरात ते राहत होते. दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. एकमेकांशी लग्न करण्याची त्यांची इच्छा होती. लग्न करण्याचा निर्णय घेत ते गोव्यात लग्न करण्यासाठीच आले होते. दोघेही लग्न करणार होते पण रोशनी आणि संजय यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होता. गोव्यात आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि संजयने रागाच्या भरात रोशनीची हत्या केली. रोशनीचा गळा चिरून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी सांगितले की, तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी तिच्या बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली.
ही घटना सोमवारी उघडकीस आली. स्थानिकांना प्रतापनगरच्या जंगलात तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासातून ती रोशनी असल्याचे समोर आले. पोलिसांनी या हत्या प्रकरणात रोशनीच्या बॉयफ्रेडला अटक केली. पोलिस अधीक्षक टिकम सिंह वर्मा यांनी सांगितले की, प्रेम प्रकरण, लग्नाचा प्रस्ताव आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाली. पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत बंगळुरू येथून अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta