
बंगळूर : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत प्रकरणांच्या संदर्भात कर्नाटकातील काँग्रेस आमदार एस. एन. सुब्बारेड्डी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अचानक छापे टाकले.
सूत्रांनी सांगितले की, बंगळुरमधील किमान पाच परिसरांची झडती घेण्यात येत आहे, ज्यामध्ये चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथील काँग्रेस आमदार सुब्बारेड्डी यांच्या घरांचाही समावेश आहे.
सूत्रांनी सांगितले की, रेड्डी यांचा व्यवसाय भागीदार देखील त्यांच्या रडारवर होता.
अधिकृत निवेदनाची वाट पाहत असताना, सूत्रांनी सांगितले की ईडीने आमदाराच्या परदेशी बँकांमध्ये असलेल्या कथित ठेवी आणि मलेशिया, हाँगकाँग आणि जर्मनीमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात केलेल्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले.
आमदारांनी अद्याप छाप्यांवर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही.

Belgaum Varta Belgaum Varta