कोप्पळ : कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील सरकारी क्लर्ककडे कोट्यवधींचे घबाड सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या क्लर्कला महिन्याला १५००० रुपये पगार होता. या क्लर्कच्या घरी छापा टाकल्यानंतर कोट्यवधींचे घबाड सापडले.
क्लर्क हा सरकारच्या कोप्पळमधील ग्रामीण पायाभूत सुविधा विकास मर्यादित या सरकारी कंपनीत कार्यरत होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो महिना १५ हजार रुपये पगारांवर कार्यरत होता. मात्र त्याने मागील काही वर्षांत कोट्यवधींची माया जमवली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त क्लर्कच्या घरात छापा मारण्यात आला. त्यानंतर त्याच्याजवळ ४० एकर जमीन, २४ घरे आणि ४ प्लॉट्स असल्याचे उघडकीस आले. तसेच त्याच्याजवळील सोने आणि चांदी देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याजवळील संपूर्ण संपत्ती त्याची पत्नी, भाऊ आणि त्याच्या नावावर होती.
मीडिया रिपोर्टनुसार, निवृत्त क्लर्क कलकप्पा निदागुंडी आणि केआरआईडीएलचा निवृत्त इंजिनीअरने अनेक रखडलेल्या प्रकल्पांचे बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणात कर्नाटकातील लोकायुक्तांनी क्लर्कच्या घरी छापा मारला. त्यानंतर कोट्यवधींचे घबाड हाती लागले. याआधी चित्रदुर्ग, हासन, चिक्कबलापुरा आणि बेंगुळरुमध्ये ५ सरकारी अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणी छापे टाकले.
Belgaum Varta Belgaum Varta