कारवार : उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश शैल यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला.
६ गाड्यांमधून २४ हून अधिक अधिकाऱ्यांनी आमदारांच्या घरावर छापा टाकला. मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीच्या बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी घरावर छापा टाकल्याचे कळते. माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतीश हेगडे यांच्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला आहे.
बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणात यापूर्वी तुरुंगवास भोगलेले आमदार सतीश शैल यांची जामिनावर सुटका झाली होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बेंगळुरूमध्ये असताना सतीश शैल यांच्या घरावर हा छापा टाकण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta